Skip to main content

रोंरावत आला वारा

लेखक पुष्कराज यांनी शनिवार, 12/09/2009 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
रोंरावत आला वारा उधळीत धुळ धूराळा वटव्रुक्ष ही गळूनी पडले आकांत पेटला सारा मी सान कळी इवलीशी अजिबात हलले नाही झेलुनी वादळ सारे मी किंचित फुलले नाही तू अजस्त्र असशी मोठा मी सान कळी इवलीशी धैर्याने ट्क्कर देते तू अखंड मी अविनाशी तू ज्ञानवंत अधिकारी परि तुज अहंपणाचा शाप स्वार्थ साधण्या प्रज्ञा तव जळुनी झाली राख रे ठावूक नाही तुजला सत्याची अमोघ शक्ती सत्तेच्या कैफाहूनही श्रेष्ठच ठरती भक्ती जा अहंपणाला तुझिया मी मूळीच मानत नाही मज आदर असे ज्ञानाचा मी गर्व जुमानित नाही फुलविण्यास रे मजला एक नाजुक फुंकर बास हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास
लेखनविषय:

वाचने 2230
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास .. मस्त

पुष्कराजशेठ, क्या बात है! तुमच्या कविता आता मस्त झोकदार होऊ लागल्यात. :) कल्पना उचलली छान आहे. मधूनच थोडी विस्कळीत वाटते. जसे पहिली ३ कडवी रूपकात मोडत नाहीत. पण नंतरची ४ कडवी रूपक धारण करतात. पण असो. चलता है. पु.ले.शु! राघव

फुलविण्यास रे मजला एक नाजुक फुंकर बास हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास ह्या ओळी क्लास्स . सुजय

तू ज्ञानवंत अधिकारी परि तुज अहंपणाचा शाप स्वार्थ साधण्या प्रज्ञा तव जळुनी झाली राख रे ठावूक नाही तुजला सत्याची अमोघ शक्ती सत्तेच्या कैफाहूनही श्रेष्ठच ठरती भक्ती वा! शेवटच्या ओळी तर परमोच्च बिंदू! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

सहीच रे पुष्क्या.. कविता आवडली मधेच पाडगांवकरांच्या 'गवताचे फूल' ची आठवण झाली. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास आवडले

फुलविण्यास रे मजला एक नाजुक फुंकर बास हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास मस्त. छान कविता - (वृत्तात 'बसवली' असती, तरी इतकी छान झाली नसती.) असेच लिहीत राहावे. अजिंक्य.

सुंदर कविता !! :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

फुलविण्यास रे मजला एक नाजुक फुंकर बास हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास >> वा भाई वा! सुरेख!! मंगेश पाडगावकरांच्या। जरी तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही | मी फूल तृणातील इवले, उमलणार तरीही नाही || या काव्यपंक्तींची आठवण करून दिली. अटल बिहारींची पण अशीच एक सुंदर कविता आहे.