प्रासंगिक
येथ ’पौरुषास अटक’, सांगून गेले जे तिथे ।
’कोरडे’ पाहून जगणे, क्रंदू लागती ते तिथे ॥
सुहृदांनो काय सांगू, भावना आमच्या इथे ।
तेव्हाही होतो ’थक्क’, ’चकीत’ झालो या इथे ॥ १ ॥
जे खुशीने विहरती वा, सुखे संचरती तिथे ।
तेच वैभव मातृभूचे वाढवू शकती तिथे ॥
खंत खुलवत नांदणे, तिथले बरे ना येथले ।
नांदा खुशीने तेथ वा, सत्वर निघुनी या इथे ॥ २ ॥
वाहिले लाटेवरी अन् पोहोचले, असती जिथे ।
ओढ घेऊन जे घराची, पाहती स्वप्ने तिथे ॥
त्यांस सल्ला हाच की, सावरा वल्ही तिथे ।
सत्वरे ती वल्हवा अन्, लवकरी पोहोचा इथे ॥ ३ ॥
भावना तुमच्या समजल्या, आम्हीही व्याकुळ इथे ।
काय राहणे ते विदेशी, तुमचे आम्हा रुचते 'असे' ॥
या इथे आयुष्य फुलवा, साथीला आम्हीही असू ।
या शिकवू या सर्व विश्वा, जगण्यात सौष्ठव ते कसे ॥ ४ ॥
वाचने
1822
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहा
सौष्ठवपूर
प्रतिसादाखातर धन्यवाद.
कविता छान