Skip to main content

बालगझलः झुऽम झुऽम झुऽम

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 12/06/2009 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
टारगेट वयोगटः २ ते ७ वर्षे ( + काहिश्या निरर्थक नादमय कवितेची मजा घेऊ शकणारा इतर कोणत्याहि वयाचा) इथे झुऽम झुऽम झुऽम ला अर्थ देणारी एखादी हस्तमुद्रा/हावभाव/अंगविक्षेप पालकांनी/शिक्षकांनी करून दाखवणे अपेक्षित आहे. तसेच शेवटाचे कडवे मुल अगदी लहान असेल व दूध पित नसेल तर या तालात पिऊन टाकते असा अनुभव आल्याने टाकले.. एरवी म्हणताना गाळले तरी चालेल =========================== विमान झेपावे कसे? झुऽम झुऽम झुऽम मासा तळी पोहतसे..झुऽम झुऽम झुऽम घोरण्याने काकांच्या मिशीवरून माशी बघा पळतसे...झुऽम झुऽम झुऽम ढेरपोट्या गोट्याच्या पोटावरून धोतर सुटले कसे...झुऽम झुऽम झुऽम टाकलेल्या केळ्याच्या सालीवरून पाय सरकती कसे..झुऽम झुऽम झुऽम तळ्यामधील कमळांच्या पानावरून बेडुक पोहति कसे...झुऽम झुऽम झुऽम बोर्नवीटा घालून ग्लासामधून बाळ दुध पितो कसे...झुऽम झुऽम झुऽम -ऋषिकेश
लेखनविषय:

वाचने 2424
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

हे हे लुशी लुशी काका! अज्युन लिही नं चान चान !!! =D> =D> =D> (गेल्या कित्येक दशकांपासुन वय वर्षे २ ) अवलिया

In reply to by चतुरंग

मलाही ते टारगटच वाटलं होतं आधी.. ;) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मजा आली :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

बालगीत चांगले आहे. गझलेचे सर्वच नियम धिक्कारल्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी बालगझल म्हणता येणार नाही. -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)