Skip to main content

राधिका

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 07/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णसख्याची प्रीत राधिका सूर कन्हैया, गीत राधिका श्यामल करि अलगूज होउनी स्वरपुष्पे उधळीत राधिका नंदनंदनासंगतीत जणु रासरंगसंगीत राधिका श्रावणघन घननीळ बरसतो कदंबतळि झेलीत राधिका चंद्रसजण मुरलीधर गगनी, चांदणकण वेचीत राधिका मुकुंदकंठी वैजयंति, शिरी मोरमुकुट निरखीत राधिका देवकिनंदन झुलवित झूला, रोमांचित, पुलकीत राधिका देह श्याम अन् प्राणहि श्यामच, जणु अद्वैत, पुनीत राधिका जन्मजन्मिची सखी, हरीचे पूर्वजन्मसंचीत राधिका
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1600
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

व्वा... देह श्याम अन् प्राणहि श्यामच, जणु अद्वैत, पुनीत राधिका जन्मजन्मिची सखी, हरीचे पूर्वजन्मसंचीत राधिका एकदम सॉलिड. ( http://www.youtube.com/watch?v=98iwKuCgPh8 ) मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

किती सुंदर आहे ही कविता...चांदणकण आणि चंद्रसजण हे शब्द विशेष आवडले...आणि नवीन चाल पण मस्त झालिये...पटकन रेकॉर्ड करून ठेव. :)