खोड्या करून इतके दुर्दैव हासलेले
पण गप्प राहण्याचे मी वचन पाळलेले
हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजर्यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...
सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले
दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...
जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...
मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...
चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू
झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4065
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा..
वा एकदम जिव्हारी लागली कविता!
वा!
क्या बात है!
वा...
वा, बेला!
वा...
In reply to वा, बेला! by पिवळा डांबिस
बरोबर
In reply to वा... by श्रावण मोडक
वा
In reply to वा, बेला! by पिवळा डांबिस
त्याचा
In reply to वा, बेला! by पिवळा डांबिस
जपलेत घाव
ठीक !
कविता आवडली
>>या अक्षता
कविता
वा!!
क्या बात है!
भारी
क्या बात है ! फार सुंदर . . .
वा!
अप्रतिम
लै भारी