Skip to main content

मैत्र: जून, जुलै आणि पावसाचे...

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 03/06/2009 23:25 या दिवशी प्रकाशित केले.

जून महिना म्हणाला पावसाला...

मी आलो, पण तू का नाही आलास?

की येवू देतोस जुलै ला?

तीच्यासोबत तूला मनसोक्त स्वतःत भटकायला..

आणि तीला मनसोक्त स्वतःत भिजवायला...

की जुलै या मैत्रिणीसाठी...

विसरलास जून या (जुन्या) मित्राला?

पूर्वी मला भेटलास की मगच..

तीला भेटायचास...

आता तीच्यासाठी मग..

मला विसरलास?

ती आली की मी जातो...

बघूया आता तू कुणाला आधी भेटतोस?

अन कुणाला भेटीसाठी ताटकळत ठेवतोस?

पुढच्या वर्षापर्यंत!

--- निमिष सोनार, पुणे

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1014
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया