क्षणात फुलतं
ओठांवर एक
कुत्सित हास्य ....
आणि उगारले जातात
विखारी शब्दांचे भाले
रोखून पाहणार्या डोळ्यांमधे
दिसते अघोरी चमक
एक असहाय्य सावज
कोंडीत पकडल्याच्या उन्मादाने
लखलखणारी
स्वतःचं 'मी' पण सुखाउन
शांत झालेलं त्यांचं मन
मश्गुल होतं .....यशाच्या धुंदीत
------- आणि माझ्या मनात
उमलत असतो ..रसरसलेला
एक बिंदू .... तिरस्काराचा !
या आत्ममग्नांच्या कळपात राहूनही
मनावर तरंगत असते
एकच जाणीव
" मला जायलाच हवं .."
कुठे? -- कसं?
काहीच माहिती नसतं
पण ...
जाणं -- जरुरी असतं
हा उंबरठा ओलांडल्या शिवाय
तिरस्काराचा तो 'बिंदू'
पुसला जाणं अवघड असतं
म्हणून जीवाच्या कराराने
पाउल उचलते ..
बंद असलेल्या दारावर
हात ठेवते ..
आणि लक्षात येतं ....
दरवाजा बंद नाहीये !
इतका वेळ उगीचच
त्याच्या भितीने
अडकून राहिले मी इथे
--- मनावर साचलेली जळमटे
क्षणात झटकली जातात
आणि बघता बघता
तिरस्काराचा तो बिंदू
दिसेनासा होतो ...
चैतन्याच्या तेजस्वी प्रवाहात |
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2175
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा,
छान!
+१
In reply to छान! by राघव
अर्थपूर्ण,
In reply to छान! by राघव
वा वा! क्या
आशय आवडला.
+१
In reply to आशय आवडला. by जागु
क्षणात
म्हणजे ..
In reply to क्षणात by परिकथेतील राजकुमार
+१
सर्व वाचकांचे
ग्रेट.