फिक्शन...
वेगाने होणारे शहरीकरण , तन्त्रज्ञानातील बेसुमार प्रगती याचा परिणाम ५० वर्षांनी (कदाचित) असा झालेला असेल..
त्यावेळच्या बाप- लेकाचे संवाद या कवितेत व्यक्त करण्याचा प्रयत्न....
कुण्या सकाळी बाबा वाचती ,
साईट वरचा पेपर एक .
जूने पुराणे पुस्तक वाची ,
बाजूलाच त्याचा लेक .
"मोर म्हणजे काय हो बाबा "?
पोर विचारी बापाला.
"Don't ask me silly questions "!
बाप खेकसे पोराला..!
"केतकीचे बन कोठे असते..?
सांगानाहो मजला बाबा"
मात्र आता बापाच्याही ,
मनावरचा सुटला ताबा.
खाडकन मग बाबा बघतो ,
काय वाचतेय अपुले पोर.
पुस्तकावरी त्या लिहीले होते,
कविता : मंगेश पाडगांवकर .
खसकन बाप ओढुनी घेतो ,
पुस्तक त्याच्या हातातले.
"नकोरे वाचू ऐसे काही
काय तुझेरे डोके फिरले.."?
"बेटा ! जुन्या माणसांच्या रे,
जुनाट असती या समजुती
राघु -मैना , चिऊ- काऊ ,
ऐसे काही पक्षीचं नसती ! "
"कुणी पाहिला मोर नाचरा..?
कुणी ऐकले कोकीळ कुंजन..?
जुन्या कल्पना, खुळ्या समजुती
हे कवींचे .. केवळ fiction "
"पुर्वीची ती माणसे पोरा
खूप खूप मागास होती
भाजी म्हणुनी खराखुरा
पाला शिजवूनी खात होती "
"भात म्हणुनी तांदूळ अख्खा
शिजवूनी ते होते खात
मुखात त्यांच्या होते म्हणे
शुभ्र-शुभ्र बत्तीस दात "
"आता कशी बघ आपण
जेवण म्हणूनी खातो गोळी
परी जेवित होते पूर्वज अपुले
हातामध्ये घेऊन थाळी "
"बाबा मजला सांगा कसे हो
इंद्रधनु ते फुले आकाशी..?"
बाप आपुल्या पोराची ,
समजुत काढी कशी बशी .
"झोप आता पोरा गुपचूप
रात्र खूप बघ आहे झाली . "
असे म्हणूनी त्याने पोरा,
झोपेची ती गोळी दिली .
बाप लेकाचा हा संवाद,
माय ऐकतसे कवतुके .
ती ही वदली , " झोप रे सोन्या
नको खाऊ रे त्यांचे डोके . "
असे बोलुनी पोरा तिने,
जरा -जारासे थोपटले .
आठवुनी तिने कसे से ,
अंगाईगीत गाईले .
नवरा वदे बायकोला मग,
"नको गं ऐसे गीत गाऊ ,
लिंबोणीचे झाड अन्,
चंद्र तयाला कोठून दाऊ . "
पोर म्हणे, "बाबा.. बाबा
गाऊ द्या ना तिला जरा ,
गोळीशिवायच येते डोळा
शांत शांत झोप मजला ."
"खर्च वाचेल गोळ्यांचा अन्
पैसेही साठतील खूप
साठलेल्या पैशातून आणु
हिरवी हिरवी झाडे खूप "
बोल ऐकुनी पोराचे ,
पाणावले नयन आईचे .
टप टप टप टप गळू लागती ,
मोती भरल्या पाण्याचे .
बघुनी पाणी डोळ्यांमधले
पोर जरासे बावरते
"आई तुझ्या डोळ्या मधुनी
असे कसे गं पाणी गळते..?"
माय म्हणे , "माझ्या पोरा,
हा मायेचा वाही झरा ,
तुझ्या बोलाने रे सोन्या
डोळ्यांनाही फुटला पान्हा...! "
लेखनविषय:
याद्या
3325
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
भविष्यातल
मस्त
+१
In reply to मस्त by ऋषिकेश
+२
In reply to +१ by अभिज्ञ
अप्रतीम
शब्द नाहीत!
जोरदार टाळ्या..
आभार..
In reply to जोरदार टाळ्या.. by प्राजु
आवडली
सुंदर...कवि
खूप वेगळा विषय
वा ! मस्त
वेगळा विषय
बदल हाच स्थायीभाव!
असेच म्हणतो
In reply to बदल हाच स्थायीभाव! by धनंजय
कवितेतील
सहमत..आवडली
In reply to कवितेतील by शितल
मस्त!
विचार करायला लावणारी कविता.....
भुतवळ
In reply to विचार करायला लावणारी कविता..... by वेताळ
फारच छान कविता
छान आहे