Skip to main content

फुलाचं जीवन

लेखक जागु यांनी शनिवार, 18/04/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
फुलांच आयुष्य - अल्पायुष इवल्याश्या आयुष्यातही पुर्ण जीवन ! कुणी काट्यावर कुणी चिखलावर परी हसर्‍या रुपाने सर्वस्व फुलवत! कर्तव्याचा संदेश सुगंधात दरवळवत हुंगले जरी कुणी कर्मात ना मोडत! कुणी माळेत, कुणी इश्वर चरणी, लीन होऊन जीवन सार्थक ! कूणी बागेत, कुणी वाटेत वाटे वाटेतुन बाग फुलवत ! कुणी गजर्‍यात, कुणी फुलदाणीत सजवण्यासाठी सदा टवटवत! कुणी गुच्छातून सन्मान राखतं कुणी मृत शय्येसही श्रद्धांजली वाहत! फुलाचं जीवन, जन्म जगण्यास शिकवतं !
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1731
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कुणी माळेत, कुणी इश्वर चरणी, लीन होऊन जीवन सार्थक ! छान कविता... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

इवल्याशा आयुष्यातही पुर्ण जीवन! खास लिहिलय जागु. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com