रान झाले उदास
पाऊस गेला बरसून
डोळीयात अनिवार
पाणी आले भरुन.....
टपकताना आसवांचे
एकेक थेंब थेंब
करपून गेले माझ्या..
न उरली काही आशा
उसवले सगळे धागे
विहारती भोवती पक्षी
पण दुरावले सारे....
सर्व काही लाभते परि
आहे काही उणे
मोहरा विनाच वृक्ष
लगडेल कसा फळाने....
या घनतिमिरी काळोखात
तुच जाहालास दिवा
आसाच तेजोमयी तुझा
सहवास मजला हवा....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1550
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
कविता छान आहे..