आमची प्रेरणा अजब यांची रचना जे मनाला पाहिजे ते...
जे तनाला पाहिजे ते गिळत नाही
जे नको गिळण्यास पण ते टळत नाही...
एवढा सदर्यात ह्या मी तंग बसतो;
हाय मापाचा कुठेही मिळत नाही...
देह हा इतका भयंकर, वाढला पण
काय खातो 'अजब' मी ते कळत नाही...
रोज प्यालो, मद्य आणिक स्लिम टी ही
मेद माझे त्यांतही विरघळत नाही...
चालणेही खूप असते गावभर पण
वजन माझे हे कसे मग ढळत नाही...?
मान ही फिरते कुठे ह्या "केशवा"ची
वळत असतो हा तरी ही वळत नाही...
स्वप्न, आशा, ध्येय माझे वजन घटणे
मी उगाचच जीम मध्ये पळत नाही...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1832
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वजनदार
लोटपोट!
मस्त !
मस्त...
वजनदार!
धमाल..
गरगरीत विडंबन आवडले गुर्जी!