Skip to main content

जग रहाटी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 05/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आईच्या गर्भातुन बाहेर येतांना मला खूप दु:ख झाले, शाश्वत वात्सल्याचच ठिकाण ते... कस सोडवणार......? मी खूप रडलो, अगदी टाहो फोडला.. पण व्यर्थ....! आश्चर्य म्हणजे.. मी इतका रडत होतो, पण माझी आई मात्र हसत होती..! आईच काय , सभोवतालची सारीच माणसे हसत होती.. आनंदाने एकमेकांना आलिंगन देत होती...!!! दुस-याच्या दु:खात आनंद मनण्याचा मुनुष्याचा पहिला संस्कार मला तेव्हाच मिळाला..! मग माझ्यावर अनेक संस्कार झाले..... मला नाव मिळाले, जात मिळाली, धर्म मिळला.. शिक्षण मिळाले.. मुख्य म्हणजे माझा असा अहंकार मिळाला... इश्वराला मनुष्य बनविण्या साठी किती खटाटोप केला त्यांनी...!! पण आता मी सुद्धा तयार झालो आहे, इश्वराला माणुस बनविण्याचा, माझाही एक कारखाना आहे... जग रहाटी चालु आहे.. चालु रहाणार आहे... नश्वर जगाचे हेच एकमेव शाश्वत सत्य आहे.......!!!!!!!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1755
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

जबरदस्त कविता...खूप भिडली मनाल..! आईचा गर्भ, हे 'शाश्वत वात्सल्याचे ठिकाण!' ही कल्पना अतिशय उच्च दर्जाची आहे..! मुख्य म्हणजे माझा असा अहंकार मिळाला... जबरा..! गोखले साहेब, जियो...! तात्या.

सुंदर कविता. आवडली. 'शाश्वत वात्सल्याचच ठिकाण ' , 'इश्वराला माणुस बनविण्याचा माझाही एक कारखाना ' ह्या उपमा खासच.

दुसर्‍याच्या दु:खात आनंद मानण्याची कल्पना वेगळीच, गमतीशीर पण न पटणारी वाटली. तरी कविता एकंदर चांगली वाटली. (परीक्षक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

वेगळीच कल्पना. वेगळ्या शब्दांत मला पटवू शकला असता असे वाटते. वात्सल्यमय गर्भातून बाळाला बाहेर हाकलणारी आई आनंदी आहे, हा जगाच्या उलट्या काळजाचा बाळकडू आहे... वा! पण ही कल्पना पटण्यासाठी, आई/कुटुंबाचा आनंद दुष्ट होता असे काही क्षणभरापुरते भाव कुशल शब्दवैचित्र्याने तुम्ही वाचकाच्या गळी घालायला पाहीजे. माझ्यापुरते म्हणावे तर तसे तुमच्या शब्दांना जमले नाही. मग पुढे ईश्वराचा मनुष्य बनवायचा कारखानाही तितका पटत नाही. तरी एकंदर कवितेची कल्पना आवडली.

कल्पना अतिशय सुन्दर आहे. क्रान्ति