...तुमच्या लिखाणातली intensity पाहून राहवलं नाही म्हणून तुमच्या भावना (तुमच्याच शब्दांत) काव्यबद्द करण्याचा प्रयत्न करतोय, चुकीचा भाव आल्यास क्षमस्व!
सत्य तू की स्वप्नभास
जाणीव अलगद स्पर्श खास
उमज नाही तनमनास
विसरू कसे मी सर्व आज
घुसमट खोल या मनाची
हाक येते ओळखीची
विसरले माझाच नाद
देऊ कशी मी प्रतिसाद
येणे खरे की सत्य जाणे
जाणे संवेदना तुझे नसणे
मन म्हणते तू दूर नाही
फक्त माझे, तु़झे हसणे
आधार नजरेचा नितनूतन
प्रेमळ कौतुक शांतवी मन
अनंत देऊन समाधान
मार्गी उभा चिरंतन
निरपेक्ष केलेस प्रेम
फक्त देणे एक नेम
तक्रार नाही, खंत दूर
किती रे तव मन सुंदर
मृत्यू तुझा छळतो मला
एवढी हळवी कशाला
सवयीचे प्रेम झाले
आज किमंत कळली मला?
>पण तुझ्या मृत्यू नंतर माझ्यात एवढा बदल कसा झाला? तुझ्या प्रेमाची दखलही न घेणारी मी आज तुझ्या विचाराने एवढी हळवी कशी झाले, तुझ्या प्रेमाची, तुझी एवढी सवय होऊन गेलेली मी आज तू ह्या जगातुन नाहीसा झाल्यावर तुझ्या प्रेमाची किमंत मला कळली का?
:)
सुंदर !
जेव्हा तो / ती आपल्या जवळ नसते तेव्हाच आपल्याला तीच्या/त्याच्या प्रेमाची किंमत कळते, असे का होत असावे ? जेव्हा ते प्रेम आपल्या जवळ नसतं तेव्हाच का किंमत कळते ? जेव्हा ते प्रेम आपल्या बरोबर असतं तेव्हा आपण त्या प्रेमाला समजवुन घ्यायला कुठेतरी कमी पडतो का ? काही क्षणाची आठवण व दिर्घकाळ येत राहणारी आठवण ह्या मधील मला काही क्षणाची आठवण आलेली आवडेल... दिर्घकाळ येत राहणारी आठवण मलाच निराशेच्या गर्ते मध्ये ढकलेल. !
शितल खरोखर उत्तम लिहले आहे... धन्यवाद.
मस्त
शितलमॅडमन
सुंदर!
छान.
>पण तुझ्या
गुरूजी...
असेच
सुरे़ख !
?
छान
धन्यवाद !
अरेच्या..
हेच म्हणते.
फार छान