आमची प्रेरणा जयंतरावांची सुंदर गझल सोबतीचा आव आहे आणि आमच्या गुरुजींचे दर्जेदार विडंबन (सोबतीचा आव आहे)
वाढला सांबार आहे, ब्रॉथ नाही
सोबतीला पाव आहे, भात नाही
भोवती अंधार आहे, रात नाही
चुंबिला तो पाय आहे, हात नाही
वाटतो हा खेळ पण ना फार सोपा
राहिले तोंडात बाकी दात नाही
घासतो मी स्वखुषीने रोज भांडी
सांगतो, पण मी तुझ्या धाकात नाही
का बरे त्यांची घरे ही साफ दिसती?
गावभर करती उकिर्डा, आत नाही ;)
सोडल्यावर तो म्हणाला, काल वायू
फक्ता हा आवाज आहे, वात नाही.
हा विडंबन पाडण्या तैयार असतो
खोड "केश्या" ची कशी ही जात नाही
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3948
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा .. फार
फक्ता हा आवाज आहे, वात नाही.
In reply to वाहवा .. फार by लिखाळ
बापरे बाप
व्वा !!
नशिब
छ्या..
In reply to नशिब by विनायक प्रभू
एकदम
केशवभाय
हाहाहा..
बोर्थ ??
बोर्थ..
In reply to बोर्थ ?? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गलती से
In reply to बोर्थ.. by प्राजु
केशवसुमार..
धाक
प्रणिपात गुर्जी!
फारच धमाल...!
जबरदस्त
धन्यवाद!