किती मैत्रिणी? ताटावरती ...
लेखनविषय:
आज कार्यबाहुल्यातून थोडा वेळ झाल्यावर झकास पैकी चहा केला, संगणाकवर अरुण दातेंची एम्पी थ्री लावली आणि मिपावरील मागिल साहित्याचा माग काढायला सुरवात केली अन स्वरगंगेच्या काठावरती हे सुरेल गीत सुरु झाले.... आणि आम्ही आमच्या भुतकाळात गेलो
किती मैत्रिणी? ताटावरती प्रश्न सुचे हा हिला
अन पूर्वीची लफडी आठवून, घाम फुटे हा मला
वदलो नि मी सावित्री ती
शकुंतला अन, ती दमयंती
आणिक नावे घ्यायची किती
हा 'सत्याचा प्रयोग' अमुचा आम्हाला बाधला
घरात कसले आता जेवण
'दुवे' निखळता कोठून मीलन
कुणी मला हो द्या उपदेशन
जालामधूनी पिसाट फिरता, प्रश्न सुटे आजला
ज्ञान पुस्तकी थोडे वापर
गुरुजनांवर फोडा खापर
शेपूट सुटले बसता पाचर
पुन्हा कधी ना 'वाम' कुशीवर, हा "केश्या" झोपला
केशवसुमार
वाचने
3590
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
किती मैत्रीणी
सही रे
हहपुवा
मस्त.. मस्त
लै लै
मस्तच!!
धन्य
सब प्रभु
अरे
In reply to अरे by विनायक प्रभू
आता..
बाहुल्या
केशवा.....
धन्यवाद!!