Skip to main content

किती मैत्रिणी? ताटावरती ...

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 24/01/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज कार्यबाहुल्यातून थोडा वेळ झाल्यावर झकास पैकी चहा केला, संगणाकवर अरुण दातेंची एम्पी थ्री लावली आणि मिपावरील मागिल साहित्याचा माग काढायला सुरवात केली अन स्वरगंगेच्या काठावरती हे सुरेल गीत सुरु झाले.... आणि आम्ही आमच्या भुतकाळात गेलो किती मैत्रिणी? ताटावरती प्रश्न सुचे हा हिला अन पूर्वीची लफडी आठवून, घाम फुटे हा मला वदलो नि मी सावित्री ती शकुंतला अन, ती दमयंती आणिक नावे घ्यायची किती हा 'सत्याचा प्रयोग' अमुचा आम्हाला बाधला घरात कसले आता जेवण 'दुवे' निखळता कोठून मीलन कुणी मला हो द्या उपदेशन जालामधूनी पिसाट फिरता, प्रश्न सुटे आजला ज्ञान पुस्तकी थोडे वापर गुरुजनांवर फोडा खापर शेपूट सुटले बसता पाचर पुन्हा कधी ना 'वाम' कुशीवर, हा "केश्या" झोपला केशवसुमार
लेखनविषय:

वाचने 3598
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

वाचायला छान आहे पण जेवणाच्या ताटा वर या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागू नये :S

बरेच वाचन करताय तर कविवर्य जरा मराठी आंतरजाल पॉलीटीकल कविता येउ दे की.

मजा आली वाचायला :)

मस्त.. मस्त ! मजा आली... धन्य आहात ! :) -- लिखाळ.

लै लै भारी! (काठावरचा) तात्या.

धन्य जाहलो... :D

सब प्रभु की माया B) ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

च्या मारी टोपी केसासना, मी लेख लिहीला रे लिहीला की तु वस्त्र्हरणाला (विडंबन) तयार असतोस की रे. असो.लै भारी

In reply to by विनायक प्रभू

तुमच्या लिव्हण्यानं आमच्या जुन्या आठवणी जाग्या व्हत्यात त्याला आमी काय करनार? (आठवणीतला)केशवसुमार

बाहुल्या खुप आहेत असे दिसते.

केशवराव... आपण धन्य आहात... सुहास दुचाकीची मागची मळ्लेली सीट म्हणजे स्वछ: चारित्र्याच लक्षण..(मी मात्र पुसून ठेवतो..)

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार