आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल वगैरे...
पुरे जाहले ते फरारी वगैरे
पुन्हा सज्ज झालो शिकारी वगैरे
खरे सांगतो टाकलेलीच नाही
तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे
विचारा खरोखर निघालास कोठे?
तुम्हा वाटले ना शिवारी वगैरे
कशाचीच आता नशा येत नाही
जरी घेतली प्रथम धारी.. वगैरे
जराशी सुगंधी असावी सुरा ही
पिण्या येत जाते उभारी वगैरे
तिथे एकटा मीच होतो विवाहित
सुखी सर्व जे ब्रम्हचारी वगैरे
चला दूर जाऊ, नवे बार शोधू
इथे फार झाली उधारी वगैरे
कवींना म्हाणे रोज येतात धमक्या
दिली "केशवा"ला सुपारी वगैरे
पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला..
बरे बंद होती "सुमारी" वगैरे..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4045
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
आईगं..........!
झोकात पुनरागमन
सहमत
In reply to झोकात पुनरागमन by घाटावरचे भट
+२
In reply to सहमत by श्रावण मोडक
जहबरा...
माताय!
कवींना
फार्मात
क्लास रे!
सह्ही
जबराट
अ प्र ती म
कविता
जबरदस्त !!
कशाचीच आता
दणक्यात
वाह!! क्या बात है!!!
अप्रतिम !
धन्यवाद!!
कवींना
च्यामारी
आताच चेपु वर ह्याची मुळ वर्जन
खुमारी