घेऊनी मोबाईल हाती
उधळली लोहगडावरील माती
थोडी लावूनी लल्लाटी
मारली हळूच पलटी
धडपडू लागली छाती ,
बघुनी सुंदर युवती
डोळे भिरभिरत दोर शोधिती
भिस्त सारी आता नशीबावरती
भोळीभाबडी होती ती पण
भोळीभाबडी वाटतेय ही पण
काय असा तु डाव मांडला
कसा काय हा बेत मी केला
पावलं टाकत पुढं आली ती
हातात मोबाईल देवून म्हणती
एक फोटो काढा ना प्लीज
मोबाईल फोन प्रवासी कविता,
| लेखनविषय: |
|---|
वाचने
183
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
सियापाईंटा वर....
सुचलेली दिसतेय!आजकाल तिकडेच जास्त गर्दी करत आहे असे वाचले आहे.
आहो,छाती धडधडते आणी पावले धडपडतात. नक्की काय झाले......
पण कवीता मात्र झकास जमलीय.
लोहगडावर दोनदा जाऊन आलो आहे.
एकदा राहून आलोय. आम्ही जातो तेव्हा आम्हीच असतो गडावर. तो,ती,ते कुणीही नसतं. मग कविता कैची?
कविता नाही आणि कल्पनाही नाही.
चला
खिलजी इज ब्याक