Skip to main content

लोहगड भ्रमण

लेखक खिलजि यांनी सोमवार, 13/07/2026 18:50 या दिवशी प्रकाशित केले.

घेऊनी मोबाईल हाती 

उधळली लोहगडावरील माती

थोडी लावूनी लल्लाटी 

मारली हळूच पलटी

धडपडू लागली छाती , 

बघुनी सुंदर युवती

डोळे भिरभिरत दोर शोधिती 

भिस्त सारी आता नशीबावरती 

भोळीभाबडी होती ती पण 

भोळीभाबडी वाटतेय ही पण 

काय असा तु डाव मांडला

कसा काय हा बेत मी केला

पावलं टाकत पुढं आली ती

हातात मोबाईल देवून म्हणती

एक फोटो काढा ना प्लीज 

 

मोबाईल फोन प्रवासी कविता, 


वाचने 256
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

सुचलेली दिसतेय!आजकाल तिकडेच जास्त गर्दी करत आहे असे वाचले आहे. 

आहो,छाती धडधडते आणी पावले धडपडतात.  नक्की काय झाले......

पण कवीता मात्र झकास जमलीय. 


एकदा राहून आलोय. आम्ही जातो तेव्हा आम्हीच असतो गडावर. तो,ती,ते कुणीही नसतं. मग कविता कैची? 

कविता नाही आणि कल्पनाही नाही.