Skip to main content

तेथें कर माझे जुळती - विडंबन काव्य!

लेखक साहना यांनी मंगळवार, 30/06/2026 10:46 या दिवशी प्रकाशित केले.

मंदत्वाची जिथे प्रचिती

तेथें कर माझे जुळती!


गाठूनिया प्रौढत्वाची पायरी

स्वतःस बालकची समजती

अजगरासम पडून राहती

ना कळे मराठी-हिंदी गणती-

तेथें कर माझे जुळती.

 


उडवूनि पालकांचे धन वैभव

निव्वळ फक्त डिग्री कमवती

परी जयांच्या मेंदूवर

नाही दिवा, नाही बुद्धी-

तेथें कर माझे जुळती.

 


निद्रा करती काळी-अकाळी

ग्रास घेती फक्त 'स्वीगी-झोमॅटो'

भित्रे काळीज कंपन पावे

कधी ना घराबाहेर पडती-

तेथें कर माझे जुळती.

 

मध्यरात्री नभघुमटाखाली

हाती फोन अन शिरी ध्वनी (इयरफोन/हेडफोन)

अस्नात, घर्म-गंधित मी

रील्स बघण्यात रात्र सरती-

तेथें कर माझे जुळती.

 

लेखनविषय:

वाचने 58
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया