चाळत असता वही शाळकरी
आत मिळाले पिंपळपान
आठवणींच्या धबधब्यात मग
भवतालाचे कुठले भान?
आठवणी काही धूसरश्या
काही जिव्हारी रुतलेल्या
अर्थ उमगण्या आधी काही
कापूर होऊनी उडलेल्या
पिंपळपानाच्या जाळीतून
काळ निसटला, तरी जेव्हा
वही चाळली शाळेमधली
मला गवसलो मीच नवा
प्रतिक्रिया
वा!! आठवणी कापूरासारख्या हे…
वा!!
आठवणी कापूरासारख्या हे आवडले.
मस्त!
छान!
- (नॉस्टॅल्जिक झालेला) सोकाजी
छान.
आवडली कविता.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
मस्त!! आवडली!!
मस्त!! आवडली!!
वही चाळली शाळेमधलीमला गवसलो…
वही चाळली शाळेमधली
मला गवसलो मीच नवा
... सुरेख चित्र दर्शी रचना
प्रतिसाद देणाऱ्या
सर्व कविता-रसिकांना धन्यवाद.
सुरेख
छान कविता. जरा मोठी हवी होती, पण आवडली.