Skip to main content

पिंपळपान

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 21/05/2026 08:28 या दिवशी प्रकाशित केले.

चाळत असता वही शाळकरी
आत मिळाले पिंपळपान
आठवणींच्या धबधब्यात मग
भवतालाचे कुठले भान?

आठवणी काही धूसरश्या
काही जिव्हारी रुतलेल्या
अर्थ उमगण्या आधी काही
कापूर होऊनी उडलेल्या

पिंपळपानाच्या जाळीतून
काळ निसटला, तरी जेव्हा
वही चाळली शाळेमधली
मला गवसलो मीच नवा

लेखनविषय:

वाचने 230
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान!

- (नॉस्टॅल्जिक झालेला) सोकाजी


आवडली कविता. 

लिहिते राहा. 

-दिलीप बिरुटे


छान कविता. जरा मोठी हवी होती, पण आवडली.