तुझ्या कवितेच्या ओळी
काळजात रुतलेल्या
अवचित ओथंबून
आज कंठात दाटल्या
कंठी दाटता दाटता
शब्द शब्द विखुरले
काही ओठी उमटले
काही पापण्यांचे झाले
ओठावरल्या शब्दांना
ओठंगून अर्थ आले
तरी वेड्या वळीवाला
पापण्यांनी थोपविले
आज सरीवर सरी
कशी करू मोजदाद
कोलाहलात दुरून
तुझ्या कवितेची साद
| लेखनविषय: |
|---|
वाचने
202
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली
ओठंगून या शब्दाचा अर्थ काय?
हेच विचारणार होते..नविन शब्द…
In reply to कविता आवडली by श्वेता२४
हेच विचारणार होते..
नविन शब्द आहे का?
ओठंगून=
In reply to हेच विचारणार होते..नविन शब्द… by Bhakti
रेलुून , आधार घेऊन
~~~~~~~~~~~~~
{ओठंगणे
(अकर्मक क्रियापद) : अर्थ: रेलणे; टेकणे; आधार घेणे.
[मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)]}
आज सरीवर सरीकशी करू…
आज सरीवर सरी
कशी करू मोजदाद
कोलाहलात दुरून
तुझ्या कवितेची साद
😀वाह!!