झुळझुळत्या निळसर वळणावर
झुकून, जळाशी झुळुक झोंबते
ऐल पैल तीरांवर अवचित
स्तब्ध लव्हाळी लहरून उठते
त्या वळणाच्या पुढे जरासा
कभिन्न काळा कातळ निश्चळ
रुणझुणत्या पाण्याचे पैंजण
ऐकत फुलते वेडी बाभूळ
निळ्या सावळ्या डोहतळाशी
अचपळ मासोळी सळसळते
पुन्हा पुन्हा त्या ध्वनिचित्राच्या
आठवणीने मन मोहरते
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1481
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
रुणझुणत्या पाण्याचे पैंजण
तुला पाहिले मी नदीच्या किनारी... तुझे केस पाठीवरी मोकळे....
सुंदर!
बकुळ?
In reply to सुंदर! by Bhakti
वाह कविराज मीटरमध्ये पण चपखल
In reply to बकुळ? by चांदणे संदीप