Skip to main content

ध्वनिचित्र

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 04/05/2023 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
झुळझुळत्या निळसर वळणावर झुकून, जळाशी झुळुक झोंबते ऐल पैल तीरांवर अवचित स्तब्ध लव्हाळी लहरून उठते त्या वळणाच्या पुढे जरासा कभिन्न काळा कातळ निश्चळ रुणझुणत्या पाण्याचे पैंजण ऐकत फुलते वेडी बाभूळ निळ्या सावळ्या डोहतळाशी अचपळ मासोळी सळसळते पुन्हा पुन्हा त्या ध्वनिचित्राच्या आठवणीने मन मोहरते
लेखनविषय:

वाचने 1481
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सुंदर! पण बाभळी ऐवजी दुसरं झाड पाहिजे होतं.

In reply to by Bhakti

कुणी बाभूळ घ्या, कुणी बकुळ घ्या! हाकानाका! :) संं - दी - प