मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कान्हा

पद्मश्री चित्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पैलतीरावर तुझी बासरी घुमते ..कान्हा, वेड लावते निळे मोरपीस ,श्यामल अंगी खुलते आणिक हळू खुणवते अस्तित्वाच्या हिंदोळ्यावर मी ही होते राधा , मीरा घनश्याम ,मनमोहन ओठी निळाईत ही विरे दिठी. निळा जलाशय निळ्या नभाशी करीतो हितगुज हळवे,कोमल सारे होई एकरूप अन् व्यापून उरतो केवळ कृष्ण

वाचने 2496 वाचनखूण प्रतिक्रिया 8

राघव गुरुवार, 10/20/2022 - 00:44
ही कविता कशी सुटली म्हणायची! सुंदर, नेहमीप्रमाणेच! आवडली!! :-)

राघव गुरुवार, 10/20/2022 - 00:44
ही कविता कशी सुटली म्हणायची! सुंदर, नेहमीप्रमाणेच! आवडली!! :-)