थोतांडवादी
लेखनविषय:
काव्यरस
अरे थोतांड थोतांड
कसे रचले कुभांड
धागा वाचता वाचता
पसरले की भोकांड
सारे भोकांड पंडित
झाले की हो एकत्रित
आणि लागले उकरू
काहीतरी विपरीत
करोनाच्या काळजीने
जीव झाला माझा अर्धा
ढवळ्या पवळ्याच्या जोडीने
सुरू उलटीची स्पर्धा
आले पंडित प्रकांड
कधी उकरोनी कांड
कुणी म्हणे नोटकांड
कोणी म्हणे नॉटिकांड
परी कसे विसरले
बोलायला अटकांड
भुलले वासनाकंड
विझवले अग्निकांड
जीव पुरता शिणला
सारे थोतांड वाचून
शुक्रवार आहे चला
येऊ पेट्रोल टाकून
वाचने
3700
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
हे हे... चान!
In reply to हे हे... चान! by खेडूत
काही इंधने बर्फा सकट घेतली जातात
In reply to हे हे... चान! by खेडूत
आम्ही पेट्रोल टाकणार त्याला
In reply to आम्ही पेट्रोल टाकणार त्याला by सुक्या
माझं पेट्रोल तुमची जबाबदारी :
भारीच की.
शुक्रवार आहे, चला येऊ पेट्रोल टाकून