Skip to main content

निळ्या टिक दाखवा हो।।

लेखक उपयोजक यांनी रविवार, 03/01/2021 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोक WhatsApp वर मेसेज वाचल्याचे कळू नये म्हणून निळ्या टिक ऑफ करतात.त्यांना विनंती मूळ गीत : निजरुप दाखवा हो गीतकार: ग.दि.माडगूळकर निळ्या टिक दाखवा हो।मॅसेज वाचल्याचे कळू द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। अपेक्षेने लिहितो मी; प्रतिसाद त्यास द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। कोणी इथे तळमळतो; त्याची चिंता सरु द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। दखल घेतलीसे माझी; हे मजला कळू द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।।
लेखनविषय:

वाचने 4227
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्त जमली आहे कविता. येईल तो मेसेज पुढे ढकलणारे किती हवालदील होतात हे बरोबर टिपले आहे.

मस्त. पण माझ्या फोनमध्ये नोटीफिकेशन ॲाफ आहे त्यामुळे नीळ्या टीक नाही दिसणार हो.