मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झोका

मी-दिपाली · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

उंच उंच झोका जाई 
निळ्या आभाळात ।
फिरी येता गोळा होई 
जीव काळजात ॥१॥

शैशवात वाटे येई 
कवेत आकाश ।
पाय लागता भुईस 
कळे तो आभास ॥२॥

घेत झेप याैवनात 
जमिनीस सोडी ।
वाऱ्यास जाई कापीत 
गगनास जोडी ॥३॥

कुरकुर ही कड्यांची 
आताशा जराशी ।
संधीकाली विसावली 
लय पश्चिमेशी ॥४॥

त्रिकालातुनी विहार 
हिंदोळा घडवी ।
अन् राधेची कृष्णावर
प्रीतही जडवी ॥५॥

.

वाचने 6980 वाचनखूण प्रतिक्रिया 14

Bhakti Wed, 07/29/2020 - 16:15
खुप सुंदर रचली आहे.आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झोक्यावर झुलण... सुंदरच

In reply to by Bhakti

खुप सुंदर रचली आहे.आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झोक्यावर झुलण
सेम असेच बोलतो. लिहिते राहा. कविता आवडली. -दिलीप बिरुटे

एस Sun, 08/02/2020 - 02:25
शैशवात वाटे येई कवेत आकाश । पाय लागता भुईस कळे तो आभास ॥२॥
ह्या पंक्ती फार आवडल्या.