मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मळभ..!

जेनी... · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कुठेतरि बरच दाटलेलं असतं आणि खरच हमसुन बरसायचं असतं उगाच नाहि , तर अगदि मनापासुन डोळ्यातलं पाणि न लपवता जमेल तितकं सांडायचं असतं आत दाटलेलं , मळभ साठलेलं कुठेतरि हमसुन बरसायचच असतं किती विचार करुन प्रत्येकवेळी आलच जरी भरुन भलत्यावेळी सारखं सारखं बाजुला सारायचं नसतं परक्याजवळ नाहि तर आपल्याच कुशीत हळुवार डोक खुपसायचं असतं आत दाटलेलं , मळभ साठलेलं कुठेतरि हमसुन बरसायचं असतं .. कुठेतरि हमसुन बरसायचच असतं ...

वाचन 6530 प्रतिक्रिया 0