...पत्र...
लेखनविषय:
काव्यरस
...पत्र ...
काय मायना घ्यावा?
कल्लोळ कसा लपवावा?
सारेच जाणते पत्र.
...पत्र...
मजकूर रिकामा होता.
पत्ताही लिहिला नव्हता.
पोचले तरीही पत्र.
...पत्र...
जीर्ण शीर्ण झालेले,
कोपरेही दुमडून गेले,
तरीही जपले पत्र!
..पत्र...
खरेच लिहिले होते?
काहीच कसेना स्मरते?
प्रश्न पाडते पत्र!
...पत्र...
वाचने
2867
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
छान!
In reply to छान! by अन्या बुद्धे
धन्यवाद!
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by यशोधरा
धन्यवाद यशोताई.
सुरेख कविता