पुन्हा पुन्हा लिहितात,
अन पुन्हा पुन्हा खोडतात,
दिवसभर मोबाईलशी,
हात, खेळत बसतात.
मनातले शब्द शेवटी
मनातंच रहातात..
माणसं दूर जातात..
पण आठवणी जवळ राहतात
टाईमलाईनवर जाऊन,
डोळे नुसतेच रेंगाळतात.
सुदाम्याचे पोहे कधीकधी
कनवटीलाच रहातात..
काव्यरस
वाचने
2686
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुलेशु.
:) मतितार्थ कळला.
In reply to पुलेशु. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आहा...मस्तच!
सुंदर!!
पद्मावति ( आता पद्मावत
:)
In reply to पद्मावति ( आता पद्मावत by प्राची अश्विनी
आवडली कविता