ग्लास पुन्हा फुटतात इथे
मित्र जुने दिसतात इथे
अवघे जगणे पीणे बनते
दु:खे सगळी पळतात इथे
चखणे स्मरता हसणे स्फुरते
चवदार चणे मिळतात इथे
हुक्के जळता चढती वलये
खमकेच टगे बसतात इथे
चषकात पुन्हा मदिरा भरता
इमले पोकळ चढतात इथे
विरहास नवे सहवास हवे
प्रेमं जुनी स्मरतात इथे
कलह घरचे विसरू म्हणता
विवाद नवे उठतात इथे
(कुणीसं म्हटलंय, वृत्त बघू नये, वृत्ती बघावी. म्हणून विकु माफी असावी.)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5733
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा .. छान कविता !
नाही. अजून डावोसलाच आहे.
In reply to वा वा .. छान कविता ! by पगला गजोधर
'प्रेमं जुनी स्मरतात इथे'
लफ़डीच जुनी स्मरतात इथे
In reply to 'प्रेमं जुनी स्मरतात इथे' by एस
लफ़डीच जुनी स्मरतात इथे
In reply to लफ़डीच जुनी स्मरतात इथे by sagarpdy
एकदम करेक्ट . चुकलंच माझं.
In reply to लफ़डीच जुनी स्मरतात इथे by sagarpdy
The मामी
मी Theमामी, तुम्ही A . आत्मा.
In reply to The मामी by अत्रुप्त आत्मा
भारीच =))
खणखणीत ! ;)
लै भारी ! :)
आंतरजालीय हडळीकुंकवात बसवली
संक्रांतीला
लै भारी
मस्त
:)
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Havana (Vertical Video) ft. Young Thug :- Camila Cabelloधन्यवाद हो सगळ्याना!
खंग्री..
विद्रावणीय इडंबन