मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज गुरुद्वादशी निमित्त मी केलेली कविता ...

वैभवदातार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सदा तुझे रूप पाहो माझे नयन | तू सगुण निर्गुण | गुरुदत्ता ||धृ. || तुझे गुणगान ऐकोत माझे श्रवण | भजन कीर्तन | गुरुदत्ता ||१ || सदा माझे मुखी असो तुझे नाम | तूंचि निजधाम | गुरुदत्ता ||२ || सुगंधी फुले मी तुजला अर्पियेली | पावन होई घ्राण | गुरुदत्ता ||३ || काया वाचा मने घडो तुझी सेवा | दर्शन देसी केव्हा? गुरुदत्ता ||४|| श्रीपाद वल्लभ स्वामी अक्कलकोट | नमितो वैभव | गुरुदत्ता ||५|| -- शब्दांकित (वैभव दातार ) गुरुद्वादशी

वाचने 911 वाचनखूण प्रतिक्रिया 2

वैभवदातार 16/10/2017 - 19:14
श्रवण म्हणजे कान आणि ऐकणे असे दोन्ही अर्थ होतात. ह्या अभंगात भाव जास्त महत्त्वाचा आहे. देवाचे नामस्मरण केल्याने कान सुद्धा तृप्त होवोत असे म्हणायचे आहे.