Skip to main content

प्रशांत दामले यांच्यावर केलेली कविता ..

लेखक वैभवदातार यांनी शुक्रवार, 13/10/2017 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
|| गौरवगीत || 'टूरटूर' पासून सुरुवात केली मागे वळून नाही पाहिले 'मोरूच्या मावशी' नंतर 'ब्रह्मचारी' केले भट साहेबांच्या साथीने नाटकात पाऊल ठेवले नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले 'लिम्का बुकात' नाव तुमचे 'गेला माधव कुणीकडे' रवींद्र नाट्य मंदिरात एक आगळे नाट्य घडे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' जागतिक विक्रम तुम्ही केले नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले गाणे असते श्रवणीय तुमचे गळा तुमचा गोड सूर असती तुमचे पक्के मिळे तालाचीही जोड 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं' गाण्याने मनावर गारूड केले नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले खाण्याची तुम्हा भारी हौस चाखता पदार्थ तुम्ही चवीने 'खवय्ये' गिरी तुमची हि अनुभवली संपूर्ण महाराष्ट्राने पाककृती करताना लोकांच्या सुख दुःखा तुम्ही जाणले नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले अचूक फेक संवादाची शब्द रुजती मना मना अंतिम रांगेतील प्रेक्षकालाही कळतात तुमच्या भावना कर्तृत्व वृक्ष बहरत जावो हाती पडोत नाट्यफुले नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले --- शब्दांकित (वैभव दातार ) १ मे २०१७
लेखनविषय:

वाचने 2342
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान कविता . अरे हाय काय नाय काय ...

आरती करायला हरकत नाही इतके प्रशान्तजीनी हसवले आहे