Skip to main content

आठवण

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 19/10/2008 09:36 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या स्वर्गवासी पत्निसाठी.....

सख्ये तुझ्या आठवणी
टच्च डोळ्यामध्ये पाणी
एक एक चांदणी
ओघळली....

***********
अजूनही तुझी वेणी
मी शोधितो गं साजणी
आपुल्या शयनी
पुन्हा पुन्हा....

************

कोण खुळा तुला सांगतो..?
मी अजुनही एकटाच रहातो..
खोटेच सांगतो...
हा बघ एकान्त घेउन उशाला
मी रोज झोपतो..
खरे सांगतो...
बघ तर येउन ..
मी वाट पहातो
वाट पहातो.....
***********

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1705
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया