Skip to main content

(ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 04/05/2017 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यजित भाऊंची उत्तम गजल "ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा" वाचली. एक 'कोबरा' सोडला तर बाकी सगळे शेर डसले! :) ईर्शाद. अर्थातच आमचा नजराणा.... ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा... येत नाही लपवता पण गाल मोठा गोबरा! मोकळ्या केसांतुनी माळून येते तेरडा अन् जटांचा जीवघेणा सुंभ दिसतो का बरा? आरसा भंजाळतो हो ती जशी डोकावते केवढी गबदूल आहे, कोण म्हणते अप्सरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी भिववतो भोळ्या जिवाला चुंबनांचा तोबरा! काय सांगू केवढी असते भयानक भेट ती? ती फुल्यांची मेहुणी अन् मी फुल्यांचा सोयरा! -चतुरंग
लेखनविषय:

वाचने 2689
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

स्वतंत्र धागा काढून ब्येष्ट केलं रंगाभाऊ ! खतरनाक विडंबन ! :)) पण ते तेरडा आलं तर हिरडा, बेहडा, रोहिडा पण यायलाच पायजेल अशी मागणी नोंदविते =))

ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा... ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा... जर जमल तर घर सार नीट आवरा जुळल कि यमक :P