Skip to main content

मी ....अब्जशीर्ष

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 03/03/2017 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी ....अब्जशीर्ष मानवता मीच फुलविते विझू पाहणारी पहिली ठिणगी जिला क्रान्तीच्या सहस्र धगधगत्या जिभा फुटतात मीच गुणगुणते बदलांची बीजाक्षरे जी दुमदुमतात महामंत्र होऊन आसमंतात ती मीच, जिच्या पायाशी चिरेबंद चिलखते भुगा होण्याआधी लोळण घेतात मीच मळते विश्व वेढून दशांगुळे उरणाऱ्या अदम्य ज्ञानलालसेच्या पायवाटा कैकदा मरून प्रतिकूलांना पुरून मीच उरते पुनःपुन्हा अब्जशीर्ष. अजिंक्य. रंग,वंश,लिंग या पलीकडची म्हणून मला हिणवू नकोस दिव्यत्वाच्या शोधात स्वतःला शिणवू नकोस.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 644
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया