Skip to main content

ती वाचत असता कविता

ती वाचत असता कविता

Published on 24/02/2017 - 10:18 प्रकाशित मुखपृष्ठ
ती वाचत असता कविता डोळ्यात तरळले पाणी गवसले हरवले शब्द आठवली विस्मृत गाणी ती वाचत असता कविता भळभळल्या बुजल्या जखमा दु:खाच्या शाश्वत प्रहरी उन्मळल्या अविचल सीमा ती वाचत असता कविता मी पुन्हा हलाहल प्यालो अवलाद नवी सर्पांची मी गळा माळुनी नटलो ती वाचत असता कविता शेवटची बेडी तुटली करुणेची धून अनाहत झंकारत आतून आली
लेखनविषय:

याद्या 666
प्रतिक्रिया 1
काव्यरस