प्रेरणा
पण होत नाही ना!
आपण जावं,
अंगणात जरा सुखानं पाणी भरुन घ्यावं
फुलांच्या बहरात पाखरांची गाणी ऐकत,
मऊशार गवतावर बसून राहावं,
डोळे मिटून.
पण होत नाही ना!
आधी कसं,
जमिनीतच सगळं अदृश्य व्हायचं
कुठेतरी एखाद्या कोंब यायचा
पण तोवर माजलेलं तण
आपणच नकळत काढून टाकावं
तरीही होत नाही ना!
आपण नुसतं बसावं,
करण्यासारखं आहे काय?
शिंपडू थोडा ओलावा
तेवढीच मनाला शांतता
च्यामारी आज होत का नाही?
फसवणुक झाल्यासारखं निष्ठुर बसायचं
धुमसत राहिलेल्या वेदनेला आतल्याआत संपवून टाकायचं?
उद्या येईल ना येईल
पण आजची चंदेरी झालर विणल्याशिवाय कसं उठायचं?
न जाणो उद्याचा उद्या नसलाच तर?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2387
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयाया, अता तांब्या तुम्ही
टका, तांब्याधिपतींना नवे
जव्हेर भाई, एकदम मस्त!
देवा! किती शिष्य आहेत नेमके
भारीच. ..
याच प्रेरणेतुन ते एक गाण आहे बॉलिवुड च्या पिच्चर मधील