Skip to main content

माझ्या मनाचे कपाट....

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 05/08/2016 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनाच्या कपाटात टांगवले आहेत अनेक ह्यांगर्स... भावना टांगवून ठेवल्यात मी त्यावर.. ते बघ गुलाबी रंगाच बायकोवरच प्रेम, हल्ली सणासुदीलाच काढतो मी बाहेर.. तो पहा माझा रागाचा ब्लेझर .. त्याच्या आतमध्ये लटकलेला अहंकाराचा शर्ट नि नेकटाय .. सहज कळू देत नाही मी कुणाला मी सुद्धा वापरतो ब्लेझर... समोरची माणस बघून ... तो द्वेषाचा घामट ,कुबट सदरा.. सभ्यपणाच सेंट मारून वापरावा लागतो . ते वेगवेगळ्या रंगाचे २ ह्यांगर्स दिसताहेत आहेत ना? . खरे तर त्यावर आहेत कामभावनेची अंतर्वस्त्रे ... सहज लक्षात नाही येत पण वापरतो मी रोजच ... कुणालाही नकळत.. या मनाच्या कपाटाला ... लावावी लागते वर्तमानाची घट्ट कडी... तेव्हाच मी जगू शकतो सभ्य माणूस म्हणून...
लेखनविषय:

वाचने 3597
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

खरे तर त्यावर आहेत कामभावनेची अंतर्वस्त्रे ... सहज लक्षात नाही येत पण वापरतो मी रोजच ... कुणालाही नकळत.. या मनाच्या कपाटाला ... लावावी लागते वर्तमानाची घट्ट कडी... तेव्हाच मी जगू शकतो सभ्य माणूस म्हणून.. जबरदस्तच.