(भूक भागत नाही)
प्रेरणा
डोनल्ड आणि मिकीवरून, हटत नाही नजर
गूफीच्या गोंधळाचे तर, हासू येते भरपूर
मधेच लाईट जाता, येतो अश्रूंचा पुर
आजीला देउन हुल , बाळ पळते दूर
पण दार असते बंद, बाहेर जाता येत नाही
नेमके अशाच वेळी, बाबा घास भरवू पाही
ओठांचा होतो चंबू, त्याला उघडावे कसे
त्रेधा उडवून सर्वांची, बाळ खुदूखुदु हसे
हताश होऊन सारे बसता, आई येते धावून
पप्पाकडून घेऊन ताट, बसते माझे खेळ काढून
डोनल्ड मिकी गूफी, मला कुणीच लागत नाही
टीवी झाला बंद तरी, त्यांची आठवण येत नाही
देते हातामध्ये घास, काउचिउला देण्यासाठी
मलाही भरवते त्यांच्यासंगे, सांगत परीच्या गोष्टी
आंबट लोणचं चाखायचं, माझ्यासारखचं करते नाटक
मी घास खाण्यासाठी, न्य्म न्य्म करते आवाज
हळूच आणते खीरीची वाटी, जेवण संपत आले की
मग मात्र मला, अजिबात लाडिगोडी लागत नाही
सारे होते चट्टामट्टा, उरतो एक उलूसा घास
तो आईला भरवल्याशिवाय, माझी भूक भागत नाही
वाचने
2191
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
गोड कविता...
अगदी प्रत्येक घरातल्या
आईशप्पथ! :)
आईशप्पथ! :)
मस्त
धन्यवाद!