Skip to main content

माझी पोर

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 08/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पोर जीवाला घोर बनून चोर कच्चा दोर कधी शांत थोर कधी मोठा शोर माझी पोर ती माझी पोर बारीक चणअ अंगात लै वणवण नुसती भणभण रोज तीच तीच गाणी चर्वण पण पण शेवटी माझीच हो.. माझीच ती पोर जीवाला घोर कधी जोरात मीठी मनात आलं तर पप्पी लहान होतो क्षणात नाही कोणाची भीती तरी शिकवतो मधून मधून अती तेथे माती सारखं सांगतो... असलं तर सूत नाहीतर भूत अन्वयात काय नाही!? 'पेशंस' बाबात काय नाही!? उत्तर तेच... 'पेशंस!' काय शिक्लास बाबा आता सांग म्हणे हे माझं पोर... एकच पुरे नो मोर नो मोर... जीवाला घोर... जीवाला घोर माझी पोर ही माझी पोर! #साशुश्रीके
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 831
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया