मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राधा

पद्मश्री चित्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कळलेच नाही मजला जडला कसा जिव्हाळा मन चिंब भिजवुनी हा जणु कृष्णमेघ गेला थेंबात प्रीत जागे स्पर्शास ओढ लागे कळले कधी न जुळले आतुर मनांचे धागे सर्वस्व ये फुलुनी जणु केवडा फुलावा हातात चांदण्यांचा जणु ताटवा मिळावा ओल्या मिठीत धुंद तू सावळा मुकुंद राधा तुझी मी झाले तोडून सर्व बंध

वाचन 4732 वाचनखूण प्रतिक्रिया 20

अनिल हटेला Sat, 09/06/2008 - 15:23
क्या बात है !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मृगनयनी Sat, 09/06/2008 - 16:00
खुप छान... प्रिय सख्याच्या भेटीची, अंतरीची तळमळ उत्कटरीत्या मांडलेली आहे... :)

अभिमन्यु Sat, 09/06/2008 - 17:31
खुपच सुंदर..... ओल्या मिठीत धुंद तू सावळा मुकुंद राधा तुझी मी झाले तोडून सर्व बंध या ओळी विशेष आवडल्यात. -अभिमन्यु (चक्रव्युहात अडकलेला)

शितल Sat, 09/06/2008 - 18:53
फुलवा, सुंदर कविता, थेंबात प्रीत जागे स्पर्शास ओढ लागे कळले कधी न जुळले आतुर मनांचे धागे ओल्या मिठीत धुंद तू सावळा मुकुंद राधा तुझी मी झाले तोडून सर्व बंध हे तर खासच..

बेसनलाडू Sun, 09/07/2008 - 00:23
हातात चांदण्यांचा जणु ताटवा मिळावा ओल्या मिठीत धुंद तू सावळा मुकुंद राधा तुझी मी झाले तोडून सर्व बंध वावावा! हे सगळ्यात जास्त आवडले. मस्त! (आस्वादक)बेसनलाडू

आनंदयात्री Sun, 09/07/2008 - 01:42
ओल्या मिठीत धुंद तू सावळा मुकुंद राधा तुझी मी झाले तोडून सर्व बंध अतिशय सुरेख !!

मदनबाण Sun, 09/07/2008 - 03:45
सर्वस्व ये फुलुनी जणु केवडा फुलावा हातात चांदण्यांचा जणु ताटवा मिळावा व्वा.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

राघव Mon, 09/08/2008 - 13:07
छान.. सुंदर! कळलेच नाही मजला जडला कसा जिव्हाळा मन चिंब भिजवुनी हा जणु कृष्णमेघ गेला हातात चांदण्यांचा जणु ताटवा मिळावा हे विशेष आवडले. कृष्णमेघ.. काय सुंदर उपमा दिलीत मुकुंदाला! वा..खूप सुंदर! येऊ द्यात अजून :) मुमुक्षू

In reply to by हर्षद आनंदी

>>कवीचे नविन नविन प्रेम प्रकरण असावे असे वाटते.. इथे कवितेबद्दल ,त्यातील भावाबद्दल बोलणे अपेक्षीत आहे. अनोळखी व्यक्तीच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल अशी उथळ शेरेबाजी करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. निदान माझ्या बाबतीत तरी माझा याला आक्षेप राहील.

स्वाती दिनेश Wed, 09/10/2008 - 13:02
हातात चांदण्यांचा जणु ताटवा मिळावा आणि.. ओल्या मिठीत धुंद तू सावळा मुकुंद राधा तुझी मी झाले तोडून सर्व बंध हे फार आवडले.. स्वाती