Skip to main content

का पाहूनही टाळत राहतेस...

लेखक शब्दबम्बाळ यांनी रविवार, 21/06/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
का पाहूनही टाळत राहतेस, काळीज माझे पिळत राहतेस… असताना सोबतीस आठवणींचे मोती, का आसवे शिंपल्यात गाळत राहतेस… तोडून सारे बंध मनाचे, का दुःख धाग्यातून माळत राहतेस… पसरून भूतकाळाच्या तप्त निखार्यांना, का स्वतःला जाळत राहतेस… झाले गेले विसरून जावे, का त्या क्षणांना उगाळत राहतेस… करून मला दूर स्वतःपासून, का स्वप्नातून माझ्या जवळ राहतेस… आशिष
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1427
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

करून मला दूर स्वतःपासून, का स्वप्नातून माझ्या जवळ राहतेस… मस्त........