मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मायमराठी

सार्थबोध · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
शब्द अलंकार भंडार, मधाळ अमृतवाणी वदे सुमधुर सिद्ध ऐसी, भाषा माझी मराठी ll १ ll वेदतुल्य मंगल प्रार्थना, आरती ईश्वराची दंड थोपटे गर्जुनी, आरोळी हो पोवाड्याची ll २ ll सुबक डौल लावण्याचा, शृंगारते लावणी तरल मनीच्या भावना, भावगीती रंगती ll ३ ll सजग करण्या जना, बोले फटका झणी ठेचुन काढी दुष्ट रुढी, भारुड कीर्तनातुनी ll ४ ll अभंग कवणे जागविती, सदभाव भक्ती वर्णन करितो विश्वाचे, मुक्तछंद पक्षी ll ५ ll शब्दांची तीक्ष्ण पाती, दंडिते शत्रू लेखातूनी संपन्न सुबत्ता शास्त्र, झळके व्याकरणातूनी ll ६ ll परंपरा नाट्यपदे नाटके, साहित्य श्रीमंती ईश्वर स्वये प्रगटे, ऐकून दिव्य संतवाणी ll ७ ll म्हणी उखाणे चारोळ्या, ऐश्या पाऊससरी जन नाहती सुखात, भाषा मराठी श्रावणी ll ८ ll - सार्थबोध

वाचने 1159 वाचनखूण प्रतिक्रिया 1