मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.......!

स्पंदना · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा. कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा, माझ काळीज काढुन टांगल तरी खुळं वाजवतय पावा. कधी यायच भान म्हणते मी कधी यायच भान म्हणते मी पण सांग मला त्यानंतर जीवंत असेन का रे मी? कुठल्यातरी आशेवर कुठल्यातरी आशेवर पावल तरी उचलतात दिसत नसली सुखं तरी बळ वाढवुन जातात नऊ महिन्याच वज्ज नऊ महिन्याच वज्ज माय शेजीच घर बघुन वाहते. नऊ महिन्याच वज्ज माय शेजीच घर बघुन वाहते काय ठाव तिला काय ठाव तिला त्या वज्ज्याचा नशिब दगड करु पाहते. कुठं हसु उमलत कुठं हसु उमलत साजरा मुखडा बघुन. कुठं डोळं पाझरतात काळजाच तुकडं होउन. सगळ आतल्या आत सगळ आतल्या आत नुसत सोसायच तमाशा होउ नये म्हणुन आतल्या आत फाटायच अस वाटत अस वाट्त द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं. अस वाटत द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं घ्यावा खुल्ला श्वास सोडुन माणुस होण्याची लाज. पण पण पायाला लंगर पण पायाला लंगर समाजातल्या लांडग्यांचा त्यांच फावल त्यांच फावल म्हणुन पदर सावरायचा डुईचा म्हणुन पदर सावरायचा डुईचा. __/\__ अपर्णा

वाचने 8229 वाचनखूण प्रतिक्रिया 36

पैसा Mon, 02/24/2014 - 09:02
बहिणाबाईंची आठवण झाली. आणि अगदी एक्झॅक्ट संबंधित नाही, पण "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" याचीही.

यसवायजी Mon, 02/24/2014 - 12:06
.....! मस्त....! .......... जाताजाता- बर्‍याच शब्दांवर . द्यायचे र्‍हायलेत. तेवढं बघा की जरा. वाचताना त्रास होतोय.

धर्मराजमुटके Mon, 02/24/2014 - 19:27
कवितेचं शीर्षक भलतेच आवडले आहे. मुक्तछंदातील ही कविता आणि तिचे शीर्षक यातुन कवयित्रीने वाचकांना आपल्या मनाप्रमाणे अर्थ काढण्याची मुभा दिलेली आहे. कवितेचंं कडवं १, ४, ५, ७ आणी ८ हे ग्रामीण ढंगात आणि २ आणि ३ प्रमाण भाषेत हे कवितेतल्या नायिकेची द्विधा मनःस्थिती दर्शवितात. त्याच त्याच शब्दांची वेगवेगळ्या ओळीमधे पुनराव्रुत्ती करुन कवयित्रीने कमीतकमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ॑ सांगीतला आहे.

In reply to by धर्मराजमुटके

स्पंदना Tue, 02/25/2014 - 02:56
मी माझ्या धाग्यावर अजिबात प्रतिसाद देत नाही, तरीही आज विचारते "सुचतय एखाद शिर्षक?" समर्पक असं? कडव नं.२ तुम्हाला प्रमाण भाषेत वाटु शकत, कारण ते माझ मन आहे,पण बाकी सगळी तिच्याच भाषेत आहेत. पुनरावृत्ती ही घडत गेली. मनाचा गुंता दर्शवत गेली. ही रचलेली कविता नव्हे. अन हे कल्पिलेलं वास्तव नाही, कविता घडते. जन्मते. तिला साधारण साफ सफाई ठिक आहे,पण अगदीच बांधत बसलात तर ती कलाकृती घडते, कविता नव्हे. या कवितेला शिर्षक द्यायची माझी हिम्मत नाही. कुणाच्या फाटल्या भावनेला नाव द्यायचा माझा अधिकार नाही. तरीही तुमचे धन्यवाद.

चाणक्य Sun, 04/13/2014 - 14:03
शेवटचं कडवं अंगावर आलं अगदी. नेमकं मांडलयत तुम्ही अपर्णा

अस वाटत द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं घ्यावा खुल्ला श्वास सोडुन माणुस होण्याची लाज. समाजात राहुन मोकळा श्वास घ्यायला कधी मिळतच नाही. समाजात वावरणे आणि २४ X ७ कॅमेर्‍या समोर रहाणे यात काहीच फरक नाही. काहिही केल / झाल तरी त्याची बातमी आणि मग त्या बातमीवर चर्चा. खरं/ खोट, चुक/बरोबर, चांगल/वाईट, काळं/पांढर अशी प्रत्येक कृतीची विभागणी होते. जीव नुसता गुदमरुन जातो. चालायचाच समाजात रहायच तर समुहाचे नियम पाळावेच लागतात. पण कधी तरी मोकळा श्वास घ्यावासा वाटतो खरा.

खरच. कधि कधि अस वाटत नको तो समाज, नको ति मानस, नको तो सन्सार. बास आपण आपल एकट असाव.जगतना नसेल कोणी कदचित बरोबर पण मेल्यावर ही रडणारे फारसे नस्तिल ना.