.......!
कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा.
कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा,
माझ काळीज काढुन टांगल
तरी खुळं वाजवतय पावा.
कधी यायच भान म्हणते मी
कधी यायच भान म्हणते मी
पण सांग मला
त्यानंतर जीवंत असेन का रे मी?
कुठल्यातरी आशेवर
कुठल्यातरी आशेवर
पावल तरी उचलतात
दिसत नसली सुखं तरी
बळ वाढवुन जातात
नऊ महिन्याच वज्ज
नऊ महिन्याच वज्ज माय
शेजीच घर बघुन वाहते.
नऊ महिन्याच वज्ज माय शेजीच घर बघुन वाहते
काय ठाव तिला
काय ठाव तिला
त्या वज्ज्याचा नशिब
दगड करु पाहते.
कुठं हसु उमलत
कुठं हसु उमलत
साजरा मुखडा बघुन.
कुठं डोळं पाझरतात
काळजाच तुकडं होउन.
सगळ आतल्या आत
सगळ आतल्या आत
नुसत सोसायच
तमाशा होउ नये म्हणुन
आतल्या आत फाटायच
अस वाटत
अस वाट्त
द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं.
अस वाटत द्याव भिर्र्कावुन हे समाजाच ओझं
घ्यावा खुल्ला श्वास
सोडुन माणुस होण्याची लाज.
पण
पण पायाला लंगर
पण पायाला लंगर
समाजातल्या लांडग्यांचा
त्यांच फावल
त्यांच फावल
म्हणुन पदर सावरायचा डुईचा
म्हणुन पदर सावरायचा डुईचा.
__/\__
अपर्णा
सुन्दर
मस्त
आई ग!
सुरेख लिहिलंय अगदी.
+१
सुंदर
छान कविता.
सुरेख!
काळजात कळ आली. '....' का ?
अपर्णातै
अप्पुतै भारी है.
____/\____
सुन्न !!
छान
.
.....!
कशाचा तमाशा होइल ठावं नाही
झ्याक लिवलंयसा. आसंच लिवत र्
टोचणारी कविता
सुंदर कविता !!!
खरच ! टोचणारी ..
.......!
मी माझ्या धाग्यावर अजिबात
असलं का लिहितेस गं..
सुंदर
लिहीलं कसंही असलं तरी विषय
धन्यवाद. मिका कोठे आहात?
बापरे
हे विशेष आवडल..
फारच हृदयस्पर्शी आहे.
__/\__
कवितेच नाव ओझं कस वाटेल?
_/\_
ग्रेट !
सुरेख!
कधि कधि