Skip to main content

मदिरा स्तोत्र

लेखक नेत्रा वैद्य यांनी बुधवार, 12/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मद्य मदिरा सुरा दारु, प्रसिध्द नामांनी असे | तीन प्रहरी प्राशिता ती, गाढ निद्रा येतसे|| रिचविता ते पेग पेग, जडत्व कायेचे नुरे | चालतानां भूमीवरुनी, स्थिर पाऊल ना ठरे || होऊनी आरक्त नेत्र, जीभ जड ती होतसे | धरेवरती स्वर्ग उतरे, कि स्वतः स्वर्गी वसे || सुरवरांना सुरा प्रिय, अप्सरांचा सवे जथा | दुग्ध शर्करा योग ऐसा, मदिराक्षी सवे सुरा || जन्म त्याचा वृथा झाला, आनंदासी मुकला | एकच प्याला नाही, ज्याने कधी तो प्राशिला || वास्तवाची जाण येता, दु:खी जीव तो होतसे | त्यापरि नशा बरी, दु:ख विस्मरण होतसे || जीन रम व्होडका, अन् गाळलेली गावठी | जातकुळी एक त्यांची, लाविता तो पेग ओठी || चकणा नामे ज्ञात असती, खारे काजू शेंगदाणे | एक मात्र जगन्मान्य, चकण्यासवे पिणे || इति नेत्रा विरचित मदिरा स्तोत्रम् दारुबाज प्रित्यर्थं समर्पितम्
लेखनविषय:

वाचने 2900
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

छान उत्तम आवडले

लाल रंगी, बहुगुणी, नाम तिचे वारुणी| रोज एक पेग घेता, पळतील सारी दुखणी|| फक्त एक काळजी घ्यावी,खातांना तो चकणा| मेद व वजन वृद्धी नियंत्रणा, मारू नका बकाणा|| कविता उत्तम झाली आहे, प्रत्यक्ष अनुभव कामी आलेले दिसतात!

क्या बात है!! जमलंय. बाकी अनुभव दांडगा आहे म्हणायचा..... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . काव्य लिहिण्याचा.