मदिरा स्तोत्र
मद्य मदिरा सुरा दारु, प्रसिध्द नामांनी असे |
तीन प्रहरी प्राशिता ती, गाढ निद्रा येतसे||
रिचविता ते पेग पेग, जडत्व कायेचे नुरे |
चालतानां भूमीवरुनी, स्थिर पाऊल ना ठरे ||
होऊनी आरक्त नेत्र, जीभ जड ती होतसे |
धरेवरती स्वर्ग उतरे, कि स्वतः स्वर्गी वसे ||
सुरवरांना सुरा प्रिय, अप्सरांचा सवे जथा |
दुग्ध शर्करा योग ऐसा, मदिराक्षी सवे सुरा ||
जन्म त्याचा वृथा झाला, आनंदासी मुकला |
एकच प्याला नाही, ज्याने कधी तो प्राशिला ||
वास्तवाची जाण येता, दु:खी जीव तो होतसे |
त्यापरि नशा बरी, दु:ख विस्मरण होतसे ||
जीन रम व्होडका, अन् गाळलेली गावठी |
जातकुळी एक त्यांची, लाविता तो पेग ओठी ||
चकणा नामे ज्ञात असती, खारे काजू शेंगदाणे |
एक मात्र जगन्मान्य, चकण्यासवे पिणे ||
इति नेत्रा विरचित मदिरा स्तोत्रम्
दारुबाज प्रित्यर्थं समर्पितम्
वाह! वा. म्हणूनच मी कप रिकामा न्हवे....
कविता छान आहे. वृत्तात अजून
मस्त...
चार पेग चढल्यावर
छान मस्त . कुजक-माजक खाईन,
,,,,,,,मदिरा स्तोत्र.....!!!!!!
लाल रंगी, बहुगुणी, नाम तिचे वारुणी|
प्रतिसादाकरिता धन्यवाद.
मला कवितेतले काही कळत नाही पण
मस्त ना राव...
वाह वा!!